
दैनिक चालु वार्ता
आ. संतोष बांगर साहेब यांनी राष्ट्रवादी व काँग्रेस च्या मदतीने सेनगाव नगरपंचायत मध्ये भाजप ला सत्तेपासून दूर ठेवत नगराध्यक्ष पदी सेनेचा भगवा फडकविला….!!!!
आ.संतोष बांगर साहेब यांच्या प्रयत्नाने सेनगाव नगरपंचायत वर शिवसेनेचा भगवा फडकला नगराध्यक्ष पदी सेनेच्या सौ.ज्योतीताई जगदीश देशमुख यांची निवड …..!!!!
आ. संतोष बांगर साहेब यांच्या उपस्थितीतऔंढा नगरपंचायत मध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरसेवकांनी केला जल्लोष….!!!!
हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या अथक परिश्रमातून औंढा नगरपंचायत वर शिवसेनेची एक हाती सत्ता आली आज औंढा नगरपंचायत वर शिवसेनेचा भगवा झेंडा मोठ्या डौलाने फडकला, शिवसेनेचे कपिल खंदारे यांची औंढा नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली तर उपनगराध्यक्षपदी तालुकाप्रमुख साहेबराव जी देशमुख यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली,आमदार बांगर यांनी निवडणूक प्रचारावेळी औंढा नगरवासीयांना शिवसेनेला एकहाती सत्ता देण्याचे आवाहन केले होते.
एकहाती सत्ता आल्यास तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे तसेच औंढा नगरवासीयांच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे वचन दिले होते,औंढ्यातील जनता जनार्दनाने सेनेला एकहाती सत्ता दिली आहे आता औंढा शहराचा सर्वांगीण विकास करण्याची व त्यांच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण करण्याची जिम्मेदारी आता माझी आहे असे आमदार बांगर यावेळी म्हणाले
तसेच आ. संतोष बांगर साहेब यांनी राष्ट्रवादी व काँग्रेस च्या मदतीने सेनगाव नगरपंचायत मध्ये भाजप ला सत्तेपासून दूर ठेवत नगराध्यक्ष पदी सेनेचा भगवा फडकविला,सेनगाव नगरपंचायत वर शिवसेनेच्या ज्योती जगदीश देशमुख यांची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीच्या शालिनी देविदास देशमुख यांची उपनगराध्यक्ष पदी निवड झाली. दरम्यान या निवडीसाठी काँग्रेस पक्षाने दोन सदस्य देऊन पाठिंबा दर्शवला आहे. राष्ट्रवादी ५, शिवसेना ५, आणि काँगेस २ असे बहुमत तयार झाले आहे. तर भाजपला ०५ सदस्य घेऊन विरोधी बाकावर बसावे लागणार आहे.
यावेळी यावेळी सहसंपर्कप्रमुख डॉ रमेश शिंदे,राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष दिलीपराव चव्हाण, जि.प.समाजकल्याण सभापती फकिरराव मुंढे,महिला व बालकल्याण सभापती रूपालीताई गोरेगावकर, उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख, परमेश्वर मांडगे, तालुकाप्रमुख संतोष देवकर, भानुदासराव जाधव, श्रीराम दादा राठी,अनिलभाई देशमुख, गटनेत्या सौ.जयाताई अनिल देशमुख, अनिल देव ,दिलीप राठोड,विष्णू पवार,राहुल दंतवार,प्रदीप कणकुटे, मनोज देशमुख,गणेश देशमुख, अनिल शिंदे,निखिल देशमुख, जगन्नाथ देशमुख, प्रवीण महाजन,राजू नागरे,पंढरी नागरे,नितीन होकर्णे,लल्ला देव,वैभव ईखे,माधव गोरे,साई गोरे,सचिन राठोड व मोठ्या संख्येने इतर मान्यवर उपस्थित होते.