
दैनिक चालु वार्ता
पिंपरी प्रतिनिधी
परमेश्वर वाव्हळ
पुणे :- कात्रज येथे सच्चाई माता परिसरात संत सेवालाल महाराज यांची २८३ वी जयंती साजरी करण्यात आली. प्रथम सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.व यज्ञ हवन पूजा केली. त्यावेळी कात्रज परिसरातील प्रमुख मान्यवर ज्योतीताई भोगवडे,नमेश भाऊ बाबर ,गीतांजलीताई जाधव, नागेश भाऊ चव्हाण ,शिवाजी मुसळे, कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रीय बंजारा परिषदचे चंदरभाऊ राठोड,राष्ट्रीय बंजारा परिषद पुणे जिल्हा उपाध्यक्ष व कात्रज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष लालु झरपला, कात्रज जयंती उत्सव, समितीचे उपाध्यक्ष भीमा खाटरावत, कात्रज जयंती उत्सव समितीचे खजिनदार व , माहिती अधिकार ,पोलीस मित्र,पत्रकार संरक्षण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष,तथा आशेरमुख फाऊंडेशनचे पुणे जिल्हाध्यक्ष कांताभाऊ राठोड,व कात्रज परिसरातील नागरिकासह गोर बंजारा समाज मोठ्या संख्येने या जयंती उत्साहात सहभागी झाला होता.