
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
पेठवडज :- पेठवडज सर्कल हे विकासापासून कोसो दूर असून पेठवडज येथे मोठी बाजारपेठ आहे. त्यानिमित्य वाहतूक व्यवस्थेसाठी रस्ते नाहीत.33 के.व्ही.विद्युत केंद्र नाही. गावाच्या पुर्वेला नदी वाहत असून त्या नदीमध्ये बेशरम, लव्हाली मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे डांसाची उत्पती मोठ्या प्रमाणात होत आहे. गावातील घाण पाणी नदीमध्ये सोडल्यामुळे डासांचे माहेरघर बनले आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी पाहणी करून आराखडा तयार केला आहे.
पेठवडज हे गाव हत्तीरोगासाठी प्रसिद्ध आहे. याचे कारण गावाच्या सभोवताल असणारे नदी नाले व त्यामधील घाण पाणी दुर्गंधी त्यामुळे डासांपासून होणारे अनेक आजार हत्तीपाय, डेंगू, मलेरीया, हिवताप, चिकन गोंन्या इत्यादी आजार होत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर पेठवडज गावाच्या समस्येचे निवारण करावे आणि जिल्हा परीषद,पंचायत समिती नविन आराखड्या मध्ये पेठवडज सर्कल ला कंधार तालुक्या – ला जोड्यावे कारण पेठवडजचा तालुका कंधार आहे.
तहसील, पंचायत समीती, पोलीस स्टेशन सर्व कंधारला आहे. फक्त आमदार मुखेडला आहे. विकासाचे कामे व्हायचे असतील तर आमदार आपल्याच तालुक्याच्या पाहीजे जिल्हा परीषद सदस्य आपल्याच सर्कलचा पाहीजे तरच कामे होतील कारण आपल दुःख आपल्याच माणसाला समजत फक्त मतदार संघाचा विचार करून मुखेड ला जोडल्यामुळे पेठवडज सर्कलचे नुकसान होत आहे.
ज्याप्रमाणे माय घरी येऊ देईना आण बाप भायीर भीक मागू देईना अशी झाली आहे पेठवडज सर्कल मधील लोकांची दैना! त्यामुळे नवीन आराखडा करतेवेळी पेठवडज सर्कल कंधार तालुक्यात सामाविष्ठ करावे अशी मागणी पेठवडज सर्कल मधील नागरिक करीत आहे.