
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधि वाजरवाडा
शिवशंकर लांडगे
वाजरवाडा :- वाजरवाडा येथे श्री. संत रोहिदास महाराज यांची ६४५ वी जयंती साजरी करण्यात आली, त्यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या मिराताई कांबळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे. यावेळी वांजरवाङा येथील सरपंच अविनाश नळंदवार, उपसरपंच भागाबाई वाघमारे, तंटामुक्तीचे अध्यक्ष पुंडलिक खंदाङे, यांनी ही यावेळी श्री. संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी वांजरवाङा येथील प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष ओमकार टाले, राहूल शिवनगे, रामचंद्र गोताळे, रामदास बोईनवाङ, व्यंकट बनसोडे, नामदेव आगलावे, तुकाराम पवार, संभाजी घुळे, रफिक शेख, रघुनाथ देशमुख, शिवाजी पाटील, पांडूरंग वाघमारे, बालाजी कांबळे, पिंटू तोगरे, बालाजी ठाकुर, शंकर धोंडापुरे,सुधाकर सोनकांबळे, तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वांजरवाङा येथील श्री. संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीचे आयोजन शिवराज वाघमारे, दत्ता लोंढे, संतोष रेणापूरे, बाबू वाघमारे, तुकाराम वाघमारे, गजानन, शिवाजी कांबळे, आदिनी केले होते.तसेच आभार प्रदर्शन माझी सरपंच माधव वाघमारे व रामचंद्र गोताळे यांनी केले.