
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- जगभरात वाढती महागाई आणि शेअर बाजारातील उतार – चढाव यामुळे सोन्याला पुन्हा एकदा झळाळी आली आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोनं 50,400 रुपयांवर गेलं आहे. हा दर मागील एक वर्षाहून अधिक काळातील सर्वोच्च आहे. एक्सचेंजनुसार, सोन्याचा वायदे भाव जानेवारी 2021 नंतर सर्वाधिक झाला आहे.
आंतरराष्ट्रीय कमॉडिटी एक्सचेंजवरही सोन्याचे दर 1900 डॉलर प्रति औंसवर पोहचले आहेत. मागील वर्षी जून 2021 मध्ये हा दर होता. 2022 मध्ये आतापर्यंत सोनं 3.6 टक्के महागले आहे. ही वाढ 2020 नंतरची सर्वााधिक वाढ आहे. त्यावेळी कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर सोनं रेकॉर्ड 2100 डॉलर प्रति औंस पर्यंत पोहोचलं होतं.