
दैनिक चालु वार्ता
तालुका प्रतिनिधी आर्णी
श्री.रमेश राठोड
आर्णी :- आर्णी तालुक्यातील कवठा ( बु.)येथे आज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने पारवा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विनोद चव्हाण साहेब व सामाजिक कार्यकर्ता अमित ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहिली आणि त्यावेळी प्रामुख्याने ठाणेदार साहेब ” शिव जन्म ” अवघ्या सृष्टीला पडलेलं एक गोड स्वप्न ज्याने या अवघ्या जगाच्या मनावर अधिराज्य गाजविले अन आजही ते सुरूच आहे , असं काय होतं राजांमध्ये ज्यामुळे अवघं जग वेडं झालं खरंच काही मोहिनी विद्या होती का की प्रत्यक्ष त्यांच्या दुश्मनाला सुद्धा त्यांचा अभिमान वाटावा कसे घडले हे गुढ आजही गूढच आहे पण मला जे वाटले ते मी तुम्हास सांगतो.
राजांनी कधीही मद्यपान केलं नाही कधीही मांसाहार केला नाही. कधीही राजे जुगार , नाच गाणे किंवा इतर वाईट छंदाच्या नादी लागले नाही ! राजांनी परस्त्री हि माते समान मानली
राजांनी एक धैय एक विचार करू स्वराज्य साकार याच प्रेरणेने कार्य केले!!. राजांनी आपल्या मातीवर आणी आपल्या माणसांवर जिवापाड प्रेम केलं आणी ती प्रेमाची नाती जपली!! तर मित्रांनो आज आपण राजांचे विचार आणी राजांचे आचरण आपल्यात वागण्यात आनुया आणी राजांच्या स्वप्नातील स्वराज्याला सर्वार्थाने आकार देऊया! असे मोलाची मार्गदर्शन गावातील लोकांना दिले व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.