
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पुणे जिल्हा
गुणाजी मोरे
पुणे :- पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या पुणे अभियोक्ता संघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी अॅड. पांडुरंग थोरवे तर उपाध्यक्षपदी अॅड. विवेक भरगुडे व लक्ष्मणराव येळे पाटील यांचा विजय झाला. वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या (पीबीए) अध्यक्षपदी ॲड. पांडुरंग थोरवे यांची निवड झाली आहे. त्यांना २ हजार ५११ मते मिळाली. त्यांनी ॲड. हेमंत झंजाड यांना पराभूत केले. ॲड. झंजाड यांना १ हजार ३८६ मते मिळाली. रात्री दोनच्या सुमारास मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला
2020 साली झालेल्या निवडणुकीत ॲड. पांडुरंग थोरवे यांचा पराभव झाला होता. त्यावेळी ॲड. सतीश मुळीक निवडणूक आले होते. यावेळी अध्यक्ष पदासाठी दोनच उमेदवार असल्याने निवडणूकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. मात्र ॲड. थोरवे आणि ॲड. झंझाड यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. उपाध्यक्षपदी ॲड.विवेक भरगुडे (२ हजार १३९ मते) आणि ॲड. लक्ष्मण येळे-पाटील (१ हजार ५५० मते), सचिवपदी ॲड सुरेखा भोसले (१ हजार ७६८ मते) आणि ॲड. अमोल शितोळ (१ हजार ८१९ मते), ऑडिटरपदी ॲड शिल्पा कदम-बिराजदार (१ हजार ८८५ मते) विजयी झाले आहेत.
खजिनदार तसेच कार्यकारिणी सदस्यांची यापुर्वीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मतदानावेळी प्रमुख निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. अशोक संकपाळ आणि सहायक निवडणूक अधिकारी ॲड. मंगेश लेंडघर यांनी कामकाज पाहिले.
इतर कार्यकारिणी खालील प्रमाणे आहे
पुणे बार असोसिएशनच्या निवडणूक 2022-23 कार्यकारिणी
अध्यक्ष –
१)ॲड.पांडुरंग थोरवे सर
उपाध्यक्ष-
१)ॲड. विवेक भरगुडे सर
२)ॲड. लक्ष्मणराव येळेपाटील सर
सचिव-
१) ॲड. सुरेखा भोसले मॕडम
२) ॲड. अमोल शितोळे सर
आॕडीटर-
१)ॲड. शिल्पा कदम-बिराजदार
खजिनदार-
१)ॲड. प्रथमेश भोईटे सर
सदस्य –
१)ॲड. कुणाल अहिर
२) ॲड. अमोल भोरडे
३)ॲड. तेजस दंडगव्हाळ
४)ॲड. सई देशमुख
५)ॲड. अमोल दुरकर
६)ॲड. अर्चिता जोशी
७)ॲड. काजल कवडे
८)ॲड. मजहर मुजावर
९)ॲड. अजय नवले
१०)ॲड. रितेश पाटील
ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली
यावेळी अॅड. देवानंद ढोकणे, ॲड. गुणाजी मोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.