
दैनिक चालु वार्ता
पारनेर प्रतिनिधी
विजय उंडे
वासुंदे/पारनेर :- स्व. मा. आ. वसंतराव झावरे पाटील यांचे ६ वे पुण्यस्मरण निमित्ताने वासुंदे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी सुजित झावरे पाटील यांनी गावातील ग्रामदैवत श्री.मारुती मंदिर, श्री.भाऊसाहेब मंदिर, महादेव मंदिरात पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. सुजित झावरे पाटील यांचे सौजन्याने तालुक्यातील पहिली भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैलगाडा शर्यतीत २०० अधिक गाडा मालक शर्यतीस उपस्थितीत होते. पुणे, अहमदनगर तसेच इतर जिल्ह्यातील बैलगाडा शौकीयांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती.
जुन्नर-आंबेगावतालुक्यात होणा-या यात्रांनंतर पठार भागातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेची नोंद होईल. तसेच सांयकाळी भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक मंडळातील सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचारी यांना ह भ प डॉ. विकासानंदजी मिसाळ महाराज यांचे हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करून सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झाला. स्व.दादांवर प्रेम करणा-याअनेक मान्यवरांची भाषणे झाली.
यावेळी मिसाळ महाराज म्हणाले की, स्वतः साठी जगणारी व्यक्ती फार पहिली जातात, परंतु जो जगासाठी जगतो तो महान असतो याठिकाणी अनेक वक्त्यांनी स्व. दादांचे वर्णन, चारित्र्य अत्यंत सुंदरपणे सांगण्यात आले. याचा अर्थ निश्चितच स्व.दादांचे जीवन महान होते.
स्व. दादांनी भाऊसाहेब महाराज संस्थेच्या माध्यमातून ज्ञान दान देण्याचे काम या भागातील मागासवर्गीय, आदिवासी, गोरगरीब जनतेला दिले. गोरगरीब जनतेची मुले शिकली पाहिजे ज्यामुळे भावी पिढी सुखसंपन्न, विद्या संपन्न होईल.राजकारणात कार्यरत असताना समाजावर एवढे प्रेम करणारा, शैक्षणिक क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या या सर्व क्षेत्रातील प्रश्न समजावून घेऊन सोडवण्याचे काम दादांनी केले. त्यामुळे खरच स्व.वसंतराव झावरे हे राजकारणातील संत होते.
यावेळी सुजित झावरे पाटील, सुप्रिया झावरे पाटील, सुदेश झावरे पाटील, प्रभाकर आण्णा पोळ, रमेश महाराज कुलकर्णी, गणेश शेळके, आझाद ठुबे, विश्वनाथ कोरडे, खंडूजी भूकन, राहुल पाटील शिंदे, श्रीमती.सुशीला ठुबे, सोन्याबापू भापकर, सुरेश पठारे, रावसाहेब रोहोकले, बाळासाहेब रेपाळे, लहू भालेकर, आण्णा मोटे, सतीश पवार, बा. ठ. झावरे, योगेश रोकडे, कर्जुले हर्याचे माजी सरपंच साहेबराव वाफारे, सोसायटी चे माजी चेअरमन अनंथा शिर्के, प्रगतशील शेतकरी पंढरीनाथ दाते, बबनराव पवार, सोपानराव करकंडे, सखाराम औटी, दगडूशेठ कपाळे, भागूजी झावरे, भाऊसाहेब सैद, दिलीपराव पाटोळे, लहू जाधव यासह अनेक मान्यवर कार्यक्रमास उपस्थितीत होते. उत्कृष्ट सुत्रसंचालक म्हणून परिसरात नावलौकिक असलेले चेमटे सर यांनी सुत्रसंचलन केले तर सुजित झावरे पाटील यांनी आभार मानले.