
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी शिवजयंतीच्या मुहूर्तावर लोह्यातील होत असलेल्या शिवाजी चौकातील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वीस लाख रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा आ. शिंदे यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी व्यासपीठावर युवा नेते विक्रांत दादा शिंदे, जि.प.सदस्य चंद्रसेन पाटील गौंडगावकर, खरेदी-विक्री संघाचे उपसभापती श्याम अण्णा पवार, गंगाधर सावकार सूर्यवंशी, ज्ञानोबा पाटील पवार,पुंडलिकराव पाटील बोरगावकर आदी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना आमदार शामसुंदर शिंदे पुढे म्हणाले की, लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेला अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा होत असल्याची बाब आनंदाची असून अमेरिका, इंग्लंड, जर्मनीच्या धर्तीवर लोहा येथील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झाला पाहिजे असे सांगून पुतळा परिसरातील सुशोभीकरणासाठी 20 लाख रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली. पुतळा समितीच्या पदाधिकार्यांनी आमच्याकडे मागणी केल्यास निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे हि त्यांनी बोलताना सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर जर निधी कमी पडला तर पुन्हा निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा सदैव तरुण पिढी सोबत राहील. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम चांगल्या पद्धतीने व्हावे कोणतेही राजकारण यांमध्ये आणू नये असे नमूद करून लोह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्या साठी येणाऱ्या काळात कोणतीही अडचण आल्यास मदत करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे यावेळी आमदार शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केले, यावेळी संचालक सुधाकर सातपुते, सिद्धू पाटील वडजे,नागेश हिलाल, श्री पाटील पवळे , राहुल पाटील बोरगावकर ,प्रसाद पाटील जाधव बाबर सह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित होते.
लोहा येथील पोलीस स्टेशनच्या रखडलेल्या बांधकामासाठी 96 लाख रुपयांचा निधी खर्च होणार
नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या लोहा शहरातील पोलिस स्टेशनच्या नवीन इमारतीचे काम निधीअभावी आठ वर्षापासून रखडले असून आमदार शामसुंदर शिंदे यांच्या प्रयत्नामुळे रखडलेले पोलीस स्टेशनचे काम पूर्ण करण्यासाठी 96 लाख रुपये निधी मंजूर करण्यात येणार असून याबाबत लवकरच इमारतीच्या कामास लवकरच प्रारंभ होणार आहे अशी माहिती आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मतदार संघातील अर्धवट रस्त्याची कामे, तसेच पुलाची कामे तसेच रस्त्याची कामे दर्जेदार करण्याच्या सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.