
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पिलभीत :- अहमदाबादेत 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरलेल्यांपैकी एक जण समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या प्रचारामध्ये सहभागी झाल्याचे बघितले गेले होते, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. समाजवादी पार्टी दहशतवाद्यांची साथ देत आहे., हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याची टीकाही आदित्यनाथ यांनी केली आहे. अहमदाबादमधअये 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी 38 जणांना शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेशातीलही काही दहशतवाद्यांचा समावेश आहे.
यापैकी एका दहशतवाद्याच्या कुटुंबीयांपैकी काही जण अखिलेश यादव यांच्या प्रचारात सहभागी झाल्याचे दिसले होते, असे आदित्यनाथ म्हणाले. उत्तर प्रदेशात सपाचे सरकार होते, तेंव्हा शेतकरी आत्महत्या करत होते. तर गरीबांची उपासमार होत होती. उत्तर प्रदेशात जंगल राज होते, अशी टीकाही त्यांनी केली. उत्तर प्रदेशात तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे.