
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- नागराज पोपटराव मंजुळे दिग्दर्शित, ‘झुंड’ हा चित्रपट 4 मार्च 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अमिताभ बच्चन स्टारर झुंड या चित्रपटाच्या निर्मात्यांनी “लफडा झाला” हे नवीन गाणे रिलीज केले आहे. अजय गोगावले यांनी गायलेले आणि अजय-अतुल (Ajay-Atul) यांनी मंथन केलेले संगीत, हे गाणे खूप उत्साह निर्माण करणारे आहे. हे एक अशे गाणे आहे जे तुम्हाला सुरांवर झटपट नाचायला लावेल.’सैराट’ (Sairat) या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे हे ‘झुंड’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.
फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांचा हा बायोपिक आहे. अमिताभ यात फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूचीही भूमिका असल्याचं कळतंय. आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणा-या नागराज यांच्या झुंड या चित्रपटाचे सर्वांना वेध लागले आहेत. कोरोनाच्या अगोदर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यावेळी त्याला प्रचंड प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती. झुंडमध्ये महानायक अमिताभ काम करणार असल्यानं चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. या चित्रपटाचं संगीत अजय-अतुल करणार आहेत.