
दैनिक चालु वार्ता
चंद्रपूर प्रतिनिधी
प्रदिप मडावी
चंद्रपूर :- आज दिनांक 19 फेब्रूवारी 2022 रोजी राज्याचे नगर विकास मंत्री श्री मा प्राजक्त तनपुरे साहेब हे प्रशासकिय कामाकरिता चंद्रपुर च्या दौऱ्या वर होते. मीटिंग ही मनपा येथे असल्याने आप चंद्रपुर टीम ने नगर विकास मंत्री यांना वेळ मागात चंद्रपुर मनपा हद्दित असलेल्या वड़गाव प्रभाग मधील झालेल्या कामाची निविदा काढून 1 करोड़ रुपये लाटन्याचा प्लान आप ने हानुण पाडले आहे व दोषिवर कड़क कार्यवाही व्हावी या करिता प्राजक्त तनपुरे साहेब याना निवेदन देउन आप चंद्रपुर जिल्हाध्यक्ष श्री सुनील मूसळे यानी सविस्तर माहिती सुद्धा दिली.
मा. मंत्री प्राजक्त तनपुरे यानी आश्वासन दिले आहे की याची चौकशी करून दोषीवर लवकरात लवकर कार्यवाही करू. या 1 करोड़ निविदा घोटाळा उघड़किस आल्यास भाजपाचे पीतळ उघड़े पडणार है मात्र नक्की आहे . या घोटाळा करिता 4 सदस्याची समिति सुधा गठित करण्यात आली असून लवकरच निर्णय लागेल.
मा. मंत्री साहेब यांना निवेदन देताना युवा जिल्हाध्यक्ष मयूर राइकवार, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, सोशल मीडिया हेड राजेश चेड़गुलवार, महानगर सचिव राजू कूड़े, महानगर उपाध्यक्ष सिकन्दर सागोरे, सुनील सदभैया, कालिदास आरके, ऋग्वेद राइकवार, निखिल बारसागड़े, व इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.