
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- महाराष्ट्राचं अराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांची काल जयंती साजरी होत आहे. अनेक ठिकाणी छत्रपती शिवरायांना वंदन केलं जातं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं आहे.त्यांनी तमाम भारतीयांना मराठीत एक संदेश देखील दिला आहे पंतप्रधानांनी छत्रपती शिवरायांना वंदन करतानाचा एक खास फोटो ट्विट केला आहे. छत्रपती शिवरायांचं कार्य हे कायम प्रेरणा देणारं आहे, मी त्यांना नमन करतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे अतुलनीय नेतृत्व आणि समाजकल्याणासाठी त्यांनी केलेलं कार्य पिढ्यानपिढ्या लोकांना प्रेरणा देत आहे. सत्य आणि न्यायाच्या मूल्यांसाठी उभे राहण्याच्या बाबतीत ते ठाम होते. त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सगळ्या ठिकाणी साजरी केली जाते आहे. महाराष्ट्रात अत्यंत उत्साहाचं वातवरण आहे.