
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पुणे :- पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ६ मार्चला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. वनाज-गरवारे कॉलेज या पहिल्या टप्प्यातील पुणे मेट्रोच्या सेवेचे ते उद्घाटन करणार याच पार्श्वभूमीवर शहरातील वेगवान वाहतुकीचे जाळे निर्माण करणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या मेट्रोचे उदघाटन करण्यात येणार आहे. यावेळी मेट्रोच्या फुगेवाडी ते पिंपरी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय या दोन टप्प्यांचे होणार उद्घाटन होणार आहे.
यासह अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन मोदींच्या हस्ते पारपडणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. या दौऱ्यात तप्रधानांची जाहिर सभा देखील होण्याची शक्यत वर्तवण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोदींचा पुणे दौरा भाजप कार्यकर्त्याना बळ देणारा ठरणार आहे.