
दैनिक चालु वार्ता
भूम तालुका प्रतिनिधी
नवनाथ यादव
भूम :- शहरामध्ये संजय नाना गाढवे प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला असून , यावेळी प्रतिमेचे पूजन माजी नगराध्यक्ष संजय गाढवे , भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय सूर्यवसे व सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्या हस्ते करण्यात आले . ही जयंती पूर्ण वर्गणी मुक्त असल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे . यावेळी सर्वधर्मीय जयंती कमिटीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत .
यावेळी साहिल गाढवे , माजी नगरसेवक संजय पवार , बाबा पटेल , आर पी आय मराठवाडा उपाध्यक्ष भागवत शिंदे , संजय गाढवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरज गाढवे , उपाध्यक्ष बाळासाहेब अंधारे , सर्वधर्मीय जयंती कमिटीचे अध्यक्ष काकासाहेब गाढवे , पंडित ढगे , माजी नगरसेवक सागर टकले , रामभाऊ बागडे , सुनील थोरात धनंजय मस्कर , राकेश जाधव , लालु पवार सह जयंती कमिटीचे व शहरातील पदाधिकारी तसेच असंख्य शिवभक्त उपस्थित होते.