
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी
संतोष मंनधरणे
देगलूर :- देगलूर शहरातील हिंगलाज माता मंदिर देगाव नाका ते फुलेनगर रस्त्याची दुरवस्था नागरिकांचे जीव धोक्यात देगाव नाका ते फुलेनगर हा जो मुख्य रस्ता आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वस्ती असून जवळ जवळ १५०ते २०० घरे असून देगलूर शहरातील नामांकित शाळा साधना हायस्कूल नगरेश्वर नगर सत्यम नगर हिंगलाज देवी मंदिर व त्यामागील भाग अशा या परिसरात सुमारे पाचशे घरांची लोकवस्ती आहे याशिवाय साधना माध्यमिक शाळा व विवेकानंद विद्या विहार या शाळेची सुमारे अडीच हजार विद्यार्थी असे एकूण सहा हजार नागरिकांचे तेजा या रस्त्यावरून दररोज होत असते.
या रस्त्याच्या दुतर्फा असलेले सर्व रहिवासी हे नगरपालिकेचे सर्व प्रकारचे कर भरतात त्या तुलनेत रहिवाशांना मात्र सेवा मिळत नाही हा भाग विकसनशील असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर बांधकामे व वस्ती वाढ होत आहे त्यामुळे ट्रॅक्टर ट्रक हायवा टिप्पर बोरगाडी या सर्व वाहनांची रहदारी सतत या रस्त्यावरून चालू असते याशिवाय इथून फक्त दोन किलोमीटर वर देगाव हे गाव आहे तिथल्या नागरिकांची रहदारी सुद्धा याच रस्त्यावरून आहे सारांश वरील सर्व कारणामुळे रहदारीची घनता प्रचंड आहे पण गेली कित्येक वर्षापासून या रस्त्याकडे कोणीच लक्ष न दिल्यामुळे अतिशय दुरवस्था झाली आहे.
रस्त्यात खड्डे चिखल व पाणी साचत असून याला अद्याप त्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे परिणाम शाळेच्या विद्यार्थ्यांचे अपघात होत आहेत व जेष्ठ नागरिक स्त्रिया यांना अतिशय त्रास होत आहे दुचाकी वाहने वारंवार या रस्त्यावर घसरून असून छोटे-मोठे अपघात होणे तर नित्याचे झाले आहे. स्थानिक नगरसेवकाकडे वारंवार तक्रार देऊन हे यात काही फरक पडलेला नाही पाच वर्षात एकदा मत मागण्यासाठी येत असे जवळपास पंचवीस वर्षापासून या भागाचे विकास झाले नाही .
तरी या भागाचा विकास करून तिथल्या नागरिकास न्याय द्यावा अशी त्या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे अन्यथा त्या नागरिकाला न्याय न मिळाल्यास लोकशाही मार्गाने मोर्चा रास्ता रोको व उपोषण हे मार्ग अवलंबण्याचे सांगितले आहे.
तरी प्रशासनाने लवकरात लवकर या भागाकडे लक्ष घालून या भागाचा विकास करावा.