
दैनिक चालु वार्ता
पालघर प्रतिनिधी
अनंता टोपले
मोखाडा :- मोखाडा तालुक्यात आदिवासी भागात अतिशय प्रसन्न वाटेल असे मनमोहक पर्यटन स्थळ आहेत. या तालुक्यात ओसरविरा येथे शिव मंदिर , देवबांद येथे गणेश मंदिर , तर नीळमाती घाटात वॉलब्रिज व सूर्यमाळ सारखे निसर्गरम्य पर्यटन ठिकाण आहेत.असे तालुक्यातील विविध ठिकाणी कान्हा कोपऱ्यात पर्यटन स्थळं आहेत. या पर्यटन स्थळांचा विकास मात्र फक्त कागदोपत्री झाला आहे. या सर्व पर्यटन स्थळांचा विकास कुठेही प्रत्यक्षरित्या झालेला दिसत नाही.या पर्यटन स्थळाच्या नावाखाली तालुक्यातील ठेकेदारांनी मोठ्या प्रमाणात लूटमार केली असल्याच दिसून येत आहे.
या मध्ये वाशेळा येथील ५० कोटी निधी मंजूर असून त्यातील काही काम पूर्ण झाल्याच दाखवून ५० लाखाच बोगस बिल काढले आहेत, ओसरवीरा येथे इमारत व प्रसाद गृह बांधण्यासाठी ४९लाख ९९हजार इतका निधी खर्च केला आहे तर या ठिकाणी फक्त सौचालय बांधण्यासाठी ९लाख ८५ हजार इतका निधी खर्च केला आहे परंतु या ठिकाणी तुम्ही जर सौचालाय बघितल तर ते ९ लाखाचा आहे अस वाटत नाही इथे आमच्या आदिवासी बांधवाना प्रधानमंत्री घरकुल योजनेचा निधी फक्त १ लाख ५० हजाराचा असतो आणि इथे सौचालय बांधण्यासाठी ९ लाख, निळमाती वॉलब्रिज येथे उजव्या व डाव्या बाजूस घाट बांधणे ३०लाख व पायऱ्या कथडे व फ्लेवरब्लॉक बसवून सुधारणा करणे १५ लाख निधी खर्च केला आहे.
मात्र त्या ठिकाणी कुठलीही सुधारणा झाल्याच दिसत नाही.
पर्यटन हा जगभर अत्यंत महत्वपुर्ण होउ पहात असलेला उद्योग आहे.भारतातही हा उद्योग चांगलाच जम धरतोय्,मात्र महाराष्ट्राच्या बाबतीत पर्यटनउद्योगात उदासीनता मोठ्या प्रमाणात आढळुन येते.
वास्तविक महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत प्रचंड विविधता आहे. मात्र आपले पर्यटन विषयक धोरण फक्त अजिंठा वेरुळ,माथेरान,महाबळेश्वर इथ पुरतेच मर्यादित आहे की काय अशी शंका येते. खरे तर ऐतिहासीक दृष्टीने विचार करता पालघर जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी वाव आहे, महाराष्ट्रातील गडकील्ले ही महाराष्ट्राची मोठी संपत्ती आहेच, परंतु पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातली पर्यटनस्थळ ही सुद्धा आपल्या पर्यटनातली मोठि पर्वणी ठरु शकते.
धार्मिक पर्यटन तर आपल्याकडे आहेच .मात्र तरीही पर्यटनाच्या माध्यमातुन सरकार च्या तिजोरित तसेच आदिवासी माणसांच्या रोजगारात फारसा फरक पडताना दिसत नाही.
महाराष्ट्राच्या भुमी मध्ये ऐतिहासीक खुणा दाखवनारी अनेक ठिकाणे आहेत रुढ अर्थाने सर्वांना माहिति असलेली ठिकाणे सोडली तरी अनेक गड किल्ले ज्या ठिकाणी मराठ्यांच्या लढाया झाल्या ती ठिकाणे ऐतिहासीक वाडे,गढ्या,पुरातन वास्तु याचा इथे सुकाळ आहे.
इथे बर्याच लोकांना असे वाटु शकेल,की कश्याला लोकांना माहीत नसलेल्या अनवट जागा दाखवायच्या?ही दुर्दैवी बाब आहे.
त्या जागेवर लोक फारसे लोक जात नाही तिथेच त्या जागेच ऐतिहासीक महत्व टिकुन राहत.या आक्षेपातहि निश्चीत तथ्य आहे कारण ज्या किल्ल्यांवर जायला रस्ता आहे तिथली अवस्थ आज काय आहे हे सर्वांनाच माहीती आहे,तिथे जाणारे पर्यटक (काही सन्माननीय अपवाद वगळ्ता)तिथे मद्यपान,ध्रुमपान करुन वातावरण दुषीत करताना दिसतात,पण तरीही हा पर्याय योग्य वाटत नाही ,कारण एक मराठी माणुस म्हणुन ती आपली जबाबदारी आहे लोकांना प्रबोधीत करण्याची. .आपल्या स्थानिक इतिहासावर आपण प्रेम केले तर मला वाट्ते हे निश्चीत अवघड नाही.
माझ्या मते याला कारणीभुत असणारी बाब म्हणजे पर्यटनाकडे अजुनही आपण ए़क उद्योग म्हणुन पाहत नाही ह्याच पर्यटन स्थळाची कामे जर वेवस्थित झाली असती तर तालुक्यातील बऱ्याचस्या लोकांना रोजगार मिळाला असता तालुक्यातील रोजगारा साठी स्थलांतर होण्याच प्रमाण देखील कमी झाल असत या बाबीला सरकारची उदासीनता तर कारणीभुत आहेच परंतु त्यात मोठ्या प्रमाणात तालुक्यातील भ्रष्ट्र ठेकेदार याला मोठ्या प्रमाणात जबाबर आहेत ज्या ज्या ठेकेदारांनी व भ्रष्ट अधिकाऱ्यांनी पर्यटन विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार केला आहे त्यांच्या वरती तातडीने चौकशी करून फोजदारी गुन्हे नोंदवावेत व डीडी गॅंग नेमके कोण याचा पडदा फाश करावा.