
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
-ढोल-ताशांच्या गजरात छ. शिवरायांना मानवंदना
-महाराष्ट्राचे लाडके राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न
अमरावती :- चांदूर बाजार येथे महाराष्ट्र राज्याचे लाडके राज्यमंत्री यांनी ज्या ठिकाणावरून आपली राजकीय कारकीर्द सुरुवात केली त्या ठिकाणी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारावा हे भाऊंचे स्वप्न होते.ते स्वप्न भाऊंनी आमदार होताच महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारून पूर्ण केले.तसेच त्या शिवतीर्थ स्थळी शिवजयंती उत्सव निमित्त प्रहार जनशक्ती पक्षातर्फे दिव्यांग मेळावा,दिव्यांग सानुगृह निधी वाटप,निराधार महिलांना रोजगार निर्मितीकरिता उद्योग उभारणीचा शुभारंभ,निराधार महिलांचे गुणवंत पाल्यांना प्रत्येकी ५ हजार आर्थिक मदत करून तसेच भव्य-दिव्य शिवपूजन कार्यक्रमाचे आयोजन करून मोठया थाटात शिवजयंती साजरी करण्यात आली.
त्यावेळी राज्यमंत्री महोदय यांनी आपले शिवशाही विचार मांडून उपास्थित जनसमुदायचे मन जिंकले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेऊन आयोजीत शिवजयंतीला शिवप्रेमींनी मोठया प्रमाणावर उपस्थिती दर्शविली आणि निराधारांना आधार देण्याचे काम आपण सर्वांनी शिवजयंती दिनी केले असे माननीय मंत्री महोदयांनी कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक यावेळी केले.