
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- १९ फेब्रुवारी शिवजयंती निमित्त झुंजार क्रांती सेनेच्या वतीने नांदेड लातुर महामार्गावरील वाडीपाटी येथे खिचडी या मेनुचे अन्नदान वाटप करण्यात आले. शिवजयंती उत्सवानिमित्त झुंजार क्रांती सेनेच्या वतीने अन्नदान वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटक झुंजार क्रांती सेनेचे अध्यक्ष ॲड अनिल होळगे व राहुल भैया हंबर्डे हे होते .
जो पर्यंत दान देणारा व दान घेणारा तहान भुखेच्या भावनेचा अनुभव येत नाही तोपर्यंत अन्नदानापेक्षा श्रेष्ठ दुसरे कोणतेही दान नाही.
– राहुल भैया हंबर्डे
अन्नदान हे सर्व श्रेष्ठदान असुन सर्वाची सु सारखीच असते संपत्ती तर ती अहंकाराने वापरू नये लोकांची निःस्वार्थपणे सेवा करावी
– ॲड अनिल होळगे
वाडीपाटी येथील या अन्नदान कार्यक्रमात प्रवासी , व्यापारी , गोर गरीब , सर्व सामान्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली यावेळी झुंजार क्रांती सेनेचे मा.गजानन चावरे , लक्ष्मण फुलझळके राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष कार्याध्यक्ष शिवा फुलझळके झुं.क्रां से. नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्ष संतोष पाटील शिंदे नांदेड दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष केशव जाधव बामणीकर धनराज नावले कंधार तालुका उपाध्यक्ष वैजनाथ स्वामी लोहा तालुका संघटक प्रकाश कंधारे कलंबर सर्कल प्रमुख पंडित मोरे वडेपुरी सर्कल प्रमुख अजय पवार बळीरामपुर सर्कल प्रमुख भोसले दादा अशोकराव हंबर्डे नागेश साठे नामदेव भोरगे गणेश भोरगे आदिंची उपस्थिती होती.