
दैनिक चालु वार्ता
परमेश्वर वाव्हळ
पिंपरी प्रतिनिधी
पुणे :- उपमहापौर गुणगौरव पुरस्कार सन २०२२ चे शानदार वितरण करण्यात आले. दरम्यान सुमारे १८ अंध मुले-मुली यांची कुठलीही स्वखर्चाने अन्न, वस्त्र, निवारा सह शिक्षण ,नोकरी , व लग्नाची जबाबदारी घेणारी उर्जा प्रतिष्ठान प्रकाशालय संस्था , व कॉम्प्युटर क्षेत्रात गरीब व गरजू मुलांना सरकारी योजना अंतर्गत स्किल डेव्हलपमेंटचे कोर्स शिकवणारी आय टी ई कम्प्युटर इन्स्टिट्यूट आणि ग्लोबल अलाईन्सेस पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन पुणे येथे “उपमहापौर गुणगौरव पुरस्काराचे”
पुणे महापालिकेच्या उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या हस्ते
उत्साहात संपन्न झाला.
प्रामुख्याने हा पुरस्कार शैक्षणिक , क्रीडा ,आरोग्य,पोलीस , व्यवसायिक , सामाजिक,सांस्कृतिक,धार्मिक ,”आदर्श माता पिता” व विविध क्षेत्रात कार्य करत असलेल्या दिग्गजांना सन्मान चिन्ह तसेच सन्मानपत्र व जन्मतारखेची अस्सल नोट व जन्मतारीख असलेली बर्थडे नोट फ्रेम अशी आगळीवेगळी भेट यावेळी देण्यात आली.या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख उपस्थिती ह्युमन राईट फाऊंडेशनचे फाउंडर प्रेसिडेंट राष्ट्रीय अध्यक्ष श्री डॉ. विक्रांत जी पवार, व्हाईस प्रेसिडेंट श्रेयस भिसे तसेच एक मराठा लाख मराठाचे संस्थापक प्रतीक दादा पवार, मायनॉरिटी फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट फिरोज खान पुरस्कार सोहळा समिती प्रमुख सुनील साठे, मनोज सोनवणे ऊर्जा प्रतिष्ठानचे प्रकाश आलय, पंकज कुलकर्णी आय टी कंप्यूटर इंस्टिट्यूट चे प्रमुख संभाजी भेगडे सर, आरती भेगडे, ग्लोबल अलाईन्सचे प्रशांत खोत, व्यास सर, शिक्षण क्षेत्रातले अग्रेसर दत्तात्रय भालेकर, सह्याद्री फाऊंडेशनचे व गड संवर्धक श्रमिक गजममुंडे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.