
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
लंडन/ नवी दिल्ली : ब्रिटनची महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, सौम्य लक्षणं असल्याचं चिंतेच कारण नसल्याचं बकिंगहम पॅलेस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.बकिंगहम पॅलस हा राणीचा राजवाडा आहे. बकिंगहम पॅलेसनं आपल्या निवदेनात म्हटलं की, “राणीला कोरोनाची लागण झाली असून त्यांना सौम्य ताप-थंडीची लक्षण आहेत.
परंतू येत्या आठवडभर त्यांच्यावर विंडसर इथं उपचार केले जाणार आहेत. या ठिकाणी राणीला वैद्यकीय मदत मिळत राहील याठिकाणी त्या सर्व योग्य मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करतील”
राणी एलिझाबेथ द्वितीय या आपला मोठा मुलगा प्रिन्स चार्ल्स अर्थात प्रिन्स ऑफ वेल्सच्या संपर्कात आल्या होत्या. ज्यांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती.