
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे शहरातील कोपरी पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वयाच्या 17 व्या वर्षी आपल्या नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या आधीच समीर वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बाजवण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
बार परवाना घेण्याच्या वेळी वय कमी असल्याने ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या आदेशाने समीर वानखडे यांच्या वाशी येथील सतगुरु बारचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच समीर वानखेडे यांच्या बारचा परवाना रद्द केला होता. समीर वानखेडे यांच्याविरोधात उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी शंकर गोगावले यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. नवी मुंबई वाशी येथून गुन्हा वर्ग केल्या नंतर कोपरी पोलिस ठाण्यात कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
गोगावले यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं की, समीर वानखेडे यांनी खोटी माहिती दिली आणि खोट्या माहितीच्या आधारे मद्य विक्रीचा परवाना मिळवला. समीर वानखेडे यांच्या नावावर नवी मुंबईतल्या वाशी येथे एक बार आहे. उत्पादन शुल्क विभागानं दिलेल्या माहितीनुसार, या बारसाठी 27 ऑक्टोबर 1997 रोजी परवाना दिला होता. या बारचे लायसन 31 मार्च 2022 पर्यंत वैध आहे. यावरुनच नवाब मलिकांनी वानखेडेंवर निशाणा साधला होता. हे बार आणि रेस्टॉरंट आहे.
वयाच्या 17व्या वर्षी नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बाजवल्यानंतर कारवाई केली होती. वाशी येथील सतगुरु हॉटेल्स च्या लायसन्स मध्ये वयाचा पुरावा नसल्याने समीर वानखडे काही त्रुटी आढळल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.