
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पुणे :- नाना पाटेकर म्हणाले की सर्वांना समान न्याय देऊन सामावून घेण्याची जी महाराजांची शिकवण आहे त्यामुळे समाज समृद्ध होईल. इतिहासाच्या नावाखाली विकृतीचे रंग पेरू नका. काही थोड्या लोकांमुळे ही विकृती पसरले जात आहे. कुठलाही धर्म हा दुसऱ्याच्या धर्माच्या द्वेषाच्या आधारित नसावा. मी हिंदु आहे जन्मलो हिंदू व मरणार देखील हिंदू परंतु मला दुसऱ्या धर्माबद्दल आदर आहे व तो कायमस्वरूपी राहणार आणि तो असायलाच पाहिजे.
यावेळी बाणेर येथे स्वराज प्रतिष्ठान च्या माध्यमातून व नगरसेविका स्वप्नाली प्रल्हाद सायकर यांच्या प्रयत्नातून साकारण्यात आलेल्या स्मारकाचे त्यांनी कौतुक केले तसेच या ठिकाणी नुसते स्मारक न उभारता स्मारकाच्या माध्यमातून वाचकांसाठी लायब्ररी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याबद्दल त्यांनी स्वराज्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रल्हाद सायकर यांचे कौतुक केले.
प्रस्तावना मध्ये स्वराज्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रल्हाद सायकर म्हणाले की 1 वर्षापूर्वी या ठिकाणी या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते चार ते सहा महिन्यांमध्ये हे स्मारक उभे करण्याचे ठरवले होते परंतु कोरोना विषाणूचा साथीमुळे या स्मारकाच्या अनावरण करण्यास उशीर झाला परंतु हे जे सुंदर असे भव्य स्मारक माझ्या माध्यमातून उभारण्यात आले आहे त्याचा मला अभिमान आहे. या स्मारकास कोणत्याही प्रकारचा शासकीय निधी उपलब्ध झाला नाही.
मी सर्वांना आवाहन केले होते त्या माध्यमातून स्मारकासाठी 64 लाख रुपये जमा झाले. या स्मारकामधून फक्त शिवाजी महाराजांची प्रेरणाच मिळणार नसून या ठिकाणी महाराजांचे विचार समजण्यासाठी वाचनालय देखील करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी ज्या सर्वांनी स्मारकासाठी मदत केली त्यांचे अभिनंदन केले. बाणेर येथील शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा अनावरण समारंभ शुक्रवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता.
यावेळी ज्येष्ठ कलाकार नाना पाटेकर व भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्मारकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, हे प्रमुख उपस्थितीत हा अनावरण सोहळा संपन्न झाला.