
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- अवघ्या भारतभर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असतांना अमरावती जिल्ह्यातील तुळजापूर जहांगीर या एका छोट्या गावामध्ये शिवजयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.गावातील काही तरुण मंडळी एकत्रित येऊन आयोजन करण्यात आले.त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवभक्त मंगेश मालठाणे , प्रमुख पाहुणे म्हणून शिवभक्त अजहर सर, कर्मयोगी फाउंडेशनचे अध्यक्ष ललित ढेपे , जेष्ठ नागरिक रावसाहेब मोहोड तर मार्गदर्शक हेमंत ढेपे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने करण्यात आली.
प्रसंगी शिवचरित्र व्याख्यान हे अजहर सर यांचे वाणीतून श्रवण करण्यात आले.मालठाणे यांनी महाराजांचे गड-किल्ले व स्थिती यावर प्रकाश टाकला त्याच प्रमाणे कर्मयोगी फाउंडेशनचे अध्यक्ष ललित ढेपे यांनी शिवाजी महाराज यांचे सोबतच सर्व महामानवांचे विचारांवर प्रकाश टाकत कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित केला.
या प्रसंगी सूत्र संचालन रोशन डवरे यांनी केले;तर सहकार्य शुभम डवरे, अभिजित ढेपे, आकाश ढेपे, स्वप्नील माहुलकर, सुमित भांगे, यश होले, हरीश काठाने, धीरज मेतकर , सौरभ ढेपे, गौरव मेतकर, गजानन ढेपे व समस्त गावकरी मंडळींची मोठया संख्येने उपस्थिती लाभली.