
दैनिक चालु वार्ता
पालघर प्रतिनिधी
अनंता टोपले
पालघर :- सदर कला क्रीडा महोत्सवात गावातील सर्वच वयोगटातील मुले मुली तसेच महिला पुरुषांनी सहभाग घेऊन स्पर्धेचा आंनद लुटला, कला क्रीडा महोत्सवाची सुरुवात सकाळी ७ वाजता मॅरेथॉन स्पर्धेने झाली. मॅरेथॉन स्पर्धेसाठी संपूर्ण गावाला एक संदेश देण्यात आला होता. गावातील सर्वच लोकांनी मॅरेथॉन स्पर्धेत धाव घेत गावाच्या विकासाला साथ देण्याचा निर्धार केला. मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले भारतीय लष्कराचे जवान मा.श्री.प्रशांत मोरे एन एड जी कमांडो यांच्या हस्ते झाले त्यांनी सुद्धा धाव घेत गावाच्या विकासाला शुभेच्छा दिल्या……
मॅरेथॉन स्पर्धेनंतर गावामध्ये भव्य अशी शिवजयंतीची मिरवणूक काढण्यात आली त्यामध्ये गावातील मुलामुलींनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच राजमाता जिजाऊ व मावळ्यांचे पोशाख परिधान केले होते आणि गावातील विद्यार्थी कु.आदर्श ठाकरे याने पोवाडा सादर करत महाराजांचा इतिहासाचे हुबेहूब प्रदर्शन केले. शिव मिरवणुकी नंतर इतर खेळांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये विविध वयोगटासाठी वेगवेगळे खेळ घेण्यात आले.
त्यामध्ये मुले मुली महिला पुरुष सर्वांनी सहभागी होत आपआपली खेळाडू वृत्ती दाखवत बक्षिसांवर आपले नाव कोरले तसेच सर्व वयोगटासाठी निबंध स्पर्धा आयोजित केली होती त्यामध्ये १)आदर्श गाव कसा असावा २) माझ्या कल्पनेतील गाव हे दोन विषय देण्यात आले होते अनेक मुलामुलींनी निबंध स्पर्धेत भाग घेत त्यांच्या मनातील आदर्श गावाविषयीच्या भावना लेखणीतून व्यक्त केल्या.
तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सुध्दा भाग घेत गावातील मुलामुलींनी सर्व मान्यवर पाहुणे व ग्रामस्थांचे मनोरंजन करत मने जिंकली. तसेच स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने गावातील सर्व आजी माजी शासकीय अधिकारी कर्मचारी यांना ग्रामरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच गावातील आशा सेविका,अंगणवाडी सेविका, नर्सेस, पोलीस पाटील, होमगार्ड, भजनी मंडळ यांना सुद्धा ग्रामरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.