दैनिक चालु वार्ता
अर्धापूर प्रतिनिधी मन्मथ भुस्से
सामाजिक बांधिकी जपून आपला वाढदिवस साजरा करून एक प्रेरणदायी ठरला रवी जाधव
नांदेड :- नांदेड हनुमान गड येथील सुमन बालग्रह मध्ये रवी प्रभाकर जाधव (YouTube music producer Dj Ravi Rj) यांनी सामाजिक भावनेतून आपल्या वाढदिवसानिमित्त अन्नदान केले व कंप्यूटर प्रोसेसर भेट देऊन वाढदिवस साजरा केला.
सध्याच्या युगात वाढदिवस साजरा करण्यात युवापिढी अग्रेसर झालेली दिसून येत आहे. काही व्यक्ती वाढदिवसाला निरर्थक गोष्टीवर खर्च करतात.मौज मज्या पार्टीमध्ये भरपूर पैशाची उधळण करतात. पण काही व्यक्ती सामाजिक भावनेतून आपल्या वाढदिवसानिमित्त गरजूंना त्यात वृद्धाश्रम,बालगृह,शिशुगृह, कुष्ठधाम इथे अन्नदान फळे वाटप भेटवस्तू असे अनेक उपक्रम राबवून आपला वाढदिवस साजरा करतात.
अशाच प्रकारे रवी प्रभाकर जाधव यांनी सामाजिक जाणीव ठेवून नांदेड येथील सुमन बालग्रह येथे अन्नदान केले व कंप्यूटर प्रोसेसर भेट देऊन आपला वाढदिवस साजरा केला.यावेळी उपस्थितांनी रवी जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी अनिल जाधव लोणकर (सावता परिषद अर्धापूर तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य प्र.लोणी खुर्द),दत्ता जाधव,नागनाथ शिंदे (शिंदे फोटोग्राफी), अजय सोनटक्के,सोनू परडे विठ्ठल इखे.लक्ष्मण राऊत, चक्रधर जाधव, दीपक सातव व इतर मित्र परिवार उपस्थित होते.