
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- लोहा शहरातील प्रसिद्ध लोकसेवा स्वस्त औषधी जेनेरिक मेडिसीन स्टोअर्सच्या प्रथम वर्धापन दिन आणि रयतेचे राजे अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमित्त त्र्यंबकेश्वर गोरकट्टे यांच्या लोहा शहरातील मेडिकल समोर रक्तदान शिबिराचे आज दि.१९फेब्रुवारी रोजी त्र्यंबकेश्वर गोरकट्टे मित्रमंडळाकडुन आयोजित केले होते. त्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि जवळपास एकुण ९२रक्तदात्यानी रक्तदान केले त्या दात्याना लोकसेवा स्वस्त औषधी जेनेरिक मेडिसीन स्टोअर्सच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त स्वागत करुन त्यांना त्र्यंबकेश्वर गोरकट्टे यांच्या हस्ते एक विशेष किट देण्यात आली त्यामध्ये सॅनिटायजर,मास्क,ह्यंनडवास आदी वस्तू देण्यात आल्या.
या रक्तदान शिबिराला लोहा तालुक्यातील सामाजिक , राजकीय , आर्थिक , शैक्षणिक क्षेत्रातील विविध संघटना संस्था , आदि मान्यवर मंडळींनी उपस्थिती लावली. लोहा तालुक्यातील सर्व गोरगरीब जनतेला व रुग्णांना सर्दी,खोकला ,ताप पासून ते शुगर ,दमा अशा अनेक रोगांवर मोफत अगदी कमी दरात म्हणजे ३०ते ७०टक्के स्वस्त दरात औषध उपलब्ध व पुरवठा करणारे एकमेव औषधी दुकान आहे.
“अस्मितेतून अस्तित्वाकडे” या भावनेतून विविध सामाजिक कार्यामध्ये कायम पुढाकार घेत त्र्यंबकेश्वर गोरकट्टे मित्र मंडळाकडून आयोजित लोहा येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले.
सध्या कोरोना महामारीमुळे रक्ताची मागणी वाढत असताना सामान्य नागरिकांना रक्तदान करणे अवघड झाले आहे. त्यामुळे रक्तदात्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेत, फिजिकल सोशल डिस्टंसिंग व इतर सुरक्षा व्यवस्थेचे काटेकोर पालन करत हे रक्तदान शिबीर घेण्यात आले.
या शिबिरात एकुण ९२ नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. कोरोना नंतरच्या व सध्याच्या काळात वैद्यकीय शस्त्रक्रियांसाठी रक्ताची राज्यात तिव्र टंचाई जाणवत असल्यामुळे शिबिराचे आयोजन करणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन आयोजक त्र्यंबकेश्वर गोरकट्टे यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन लोहा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य असलेले प्रा गोविंद कोपनर सर यांनी केले.