
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी केशव पवार यांची तर जिल्ह्याच्या प्रभारी संघटकपदी डि एन कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची एका वर्षीची कार्यकारी पुर्ण झाल्याने तालुकाध्यक्ष केशव पवार यांच्या मागील एका वर्षातील कार्याचा आढावा घेत पञकार संघाने त्यांच्यावर थेट जिल्हा उपाध्यक्षपदाची धुरा सोपवली व मागील वर्षातील कार्याध्यक्ष डि एन कांबळे यांच्यावर नांदेड जिल्ह्याच्या प्रभारी संघटकपदाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातील , मुंबई प्रदेशाध्यक्ष वसंत मुंढे , राज्य संघटक संजय बोकारे , प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे , यांच्या मान्यतेने निवड केली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे , मराठवाड्याचे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी यावेळी नियुक्तीपञ दिले .
नांदेड जिल्ह्यात लोह्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अतिशय सुंदररित्या सामाजिक , शैक्षणिक , जयंती , पुण्यतिथी , विविध कार्यक्रमांचे आयोजन असल्याने या टिमचे राज्यभरात कौतुक केले जात असुन लोहा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातील तालुकास्तरीय सदस्यांना जिल्हास्तरावर निवड केल्याने तालुक्यातुनच नव्हे तर जिल्हा भरातुन शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे लोहा तालुकाध्यक्ष जगदीश कदम उपाध्यक्ष फेरोज मणियार , विरभद्र एजगे , कार्याध्यक्ष मुर्तुजा शेख , सचिव बाळासाहेब कतुरे , कोषाध्यक्ष प्रविण महाबळे व सदस्यांचे लोहा तालुक्यात विविध ठिकाणी शैक्षणिक , राजकीय , सामाजिक , व विविध संघटनेच्या सत्कार करून शुभेच्छा दिल्या जात आहेत.