
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
नांदेड :- गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रक्तदान शिबिर नगरसेवक जीवन पाटील चव्हाण यांच्या पुढाकारातून घेण्यात आले.या रक्तदान शिबीरात तब्बल ९५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी,भीमाशंकर मामा कापसे, नगरसेवक अमोल सावकार व्यवहारे,केतन खिल्लारे यांची उपस्थिती होती.
प्रथमतः नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील प्रभाग क्रमांक १चे लोकप्रिय नगरसेवक जीवन भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी तब्बल ९५ रक्तदान त्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीराचे उद्घाटन प्रसंगी बोलताना नगराध्यक्ष म्हणाले कि,छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची जोपासना करण्याचे,अंगिकारण्याचे काम खऱ्या अर्थाने नगरसेवक जीवन चव्हाण आपल्या समाज कार्यातून करतआहेत.असेही ते म्हणाले.
रक्तदान शिबीरात एकूण ९५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. लोकप्रिय नगरसेवक जीवन पाटील चव्हाण यांच्या मित्र मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास शिबिराचे आयोजक व तळमळीने जबाबदारी पेलणारे प्रतिक उर्फ मोनुभाऊ ढवळे,सल्लागार प्रविण ऊर्फ सोनूभाऊ अरविंद ढवळे व मित्र परिवाराच्या वतीने सदरिल रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अशोक घाटे,संदिप बगाडे,विशाल कराळे,गौतम कांबळे,अमोल देबडवार,साई हिरवे,रियाज शेख,किशोर पांडलवाड, ऋषिकेश श्रीमंगले,सुमीत ढवळे, आकाश राठोड,शिवा गिराम, दिपक डोम,आकाश फाळके किरण खांडेकर,राज कांबळे अजय बोराडे,नागेंद्र कांबळे मनोज निखाते सह छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील तरूण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
सदरील कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचलन लक्ष्मण पाटील फाळके केले.तर उपस्थित सर्वांचे आभार नगरसेवक जिवन पाटील चव्हाण यांनी मानले. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक १ मध्ये चौफेर विकास होत असून त्याचाच भाग म्हणजे गेली कित्येक दिवसापासून प्रलंबित असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा साकारतोय ही अभिमानाची बाब आहे.
-नगरसेवक जीवन पाटील चव्हाण