
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
हैदराबाद :- दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटातील आयटम साँगमुळे चर्चेत आहे. आता समांथाच्या आगामी चित्रपट ‘शकुंतलम’मधील लूक प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे. समांथाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर ‘शकुंतलम’ चित्रपटातील लूक शेअर केला आहे. हा लूक शेअर करत तिने छान असे कॅप्शन दिले आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये समांथा ही शकुंतलाच्या लूकमध्ये दिसत आहे. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
या चित्रपटात समांथासोबत देव मोहन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शकुंतलाच्या भूमिकेत समांथा दिसणार आहे तर देव मोहन दुष्यंतची भूमिका साकारणार आहे. अभिनेता अल्लू अर्जुनची मुलगी देखील या चित्रपटात दिसणार आहे. ती चित्रपटात प्रिंस भरत ही भूमिका साकारणार आहे. यापूर्वी समांथा ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिचे ऊ अंटवा हे गाणे चर्चेत होते. त्यानंतर आता ती ‘शकुंतलम’ या चित्रपटात दिसणार आहे. त्या पोठापाठ यशोदा आणि या चित्रपटात ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
दरम्यान, तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर समांथा आणि नागा चैतन्यने २०१७ मध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाला ४ वर्षे पूर्ण होण्याआधीच ते विभक्त झाले. रिपोर्टनुसार, समांथाला नागा चैतन्यच्या कुटुंबाकडून २०० कोटी रुपये पोटगी म्हणून मिळणार होते. पण तिने त्यांच्याकडून १ रुपया ही घेण्यास नकार दिलाय.