
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी वाडा
मनिषा भालेराव
वाडा :- जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने वाड्यातील आगरआळीतील गुडलूक यंग क्लबच्या मैदानात शनिवारी (दि.१९ फेब्रुवारी) शिवजयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संसंस्थेच्या भावना भगवान सांबरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तसेच जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी , सदस्य व मान्यवरांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलन करून महाराजांना मानवंदना दिली या प्रसंगी सफाई कामगारांचा ही सत्कार करण्यात आला होता.
सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित व्याख्यान ऐकवून मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी उल्लेखनीय कामगिरी कणाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
सदरच्या कार्यक्रमास विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी दैनिक चालु वार्ताच्या पत्रकार मनीषा भालेराव यांचा वाडा तालुक्यातील महिला पत्रकार म्हणून सत्कार करण्यात आला.