
दैनिक चालु वार्ता
खंडाळी सर्कल प्रतिनिधी
राठोड रमेश
खंडाळी :-ग्रामपंचायत कार्यालय धसवाडी ता.अहमदपूर जि. लातूर अंतर्गत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेत चुकीच्या माहितीमुळे गरीब व गरजू कुटुंबावर अन्याय झाल्याचा प्रकार घडला आहे.संदर्भित विषयाचा पाठपुरावा गावातील तरुण रंजीत क्षीरसागर,सचिन क्षीरसागर, महादेव देशमुख, विजय क्षीरसागर, गुंडेराव बोईनवड , दत्ता क्षीरसागर, संतोष भसंपूरे, विजयकुमार क्षीरसागर, माधव मोते या मुलांनी पाठपुरावा केला असता ही माहिती समोर आली आहे .
जिल्हा प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा लातूर चे संचालक श्री प्रभू जाधव यांनी तसे लेखी पत्रकात कळवले असून पात्र कुटुंबाची चुकीची माहिती भरण्यात आल्याचे निदर्शनास आले असल्याचे म्हटले आहे.तरी पात्र कुटुंबाची चुकीची माहिती शासनास पुरवणाऱ्या अधिकारी तसेच संबंधितावर कार्यवाही करून गुन्हे दाखल करण्याची मागणी गावातील तरुण मुलांनी तहसीलदार कार्यालय तसेच उपविभागीय कार्यालय व गट विकास अधिकारी यांना केली आहे.
सदर प्रकरणात साधन आणि कर्मचारी वर्ग असलेल्या कुटुंबीयांची नावे असल्यामुळे भ्रष्टाचार झाल्याचे नाकारता येतं नाही. तत्काळ या प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा सनदशीर मार्गाने दिनांक 1 मार्च 2022 पासून गावातील तरुण मुलांनी धरणे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन तहसीलदार कार्यालय तसेच उपविभागीय अधिकारी व गट विकास अधिकारी यांना दिले आहे.