
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
भाजपचे सरकार नव्हते त्या आधीच्या काळात महाराष्ट्रात राजकारणाचा एक दर्जा होता. त्याचा आदर्श राखला जायचा. महाराष्ट्राचा हा आदर्श अनेक राज्यात घेतला जायचा. मात्र आज भाजपने जो थयथयाट सुरु केला आहे यामुळेच महाराष्ट्रात राजकारणाचा दर्जा घसरला आहे. भाजप सत्तेशिवाय राहू शकत नाही. सत्तेबाहेर राहिलेच तर त्यांचे नेते राजकारणाचा स्तर खाली आणायचे आणि खोटे आरोप लावायचे आणि सत्ता कशी ताब्यात घ्यायची असा प्रयत्न महाराष्ट्रात सुरु आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकारण खालावत असल्याचे चित्र आहे अशी खंत पटोले यांनी व्यक्त केली.