
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- भारताचा युवा ग्रॅंडमास्टर आर. प्रज्ञानंद याने एअर थिंग्ज मास्टर्स ऑन-लाईन जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत आठव्या फेरीत जगजेत्या अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसन याच्यावर सनसनाटी मात केली. त्याने काळ्या मोहऱ्यांसह खेळताना ३९ चालीत विजय मिळविला. प्रज्ञानंदाने क्वीन्स गॅम्बीट डिक्लाइंड-तॅरॅश विविधतेत झालेल्या डावात कार्लसनची सलग तीन विजयाची मालिका खंडित केली. प्रज्ञानंदविरुद्ध खेळताना कार्लसनला डावाच्या अंतिम टप्प्यात टॅक्टिकल चूक महागात पडली. या विजयानंतर प्रज्ञानंद संयुक्त १२व्या स्थानावर आला असून, त्याचे आठ फेरीत आठ गुण झाले आहेत.
त्याच्या खेळातील सातत्य हेच त्याच्या कार्लसनवरील विजयाचे वैशिष्ट्य होते. त्याने स्पर्धेत यापूर्वी लेवॅन अरोनियन याच्यावर देखिल मात केली. आतापर्यंत चार पराभव पत्करणाऱ्या प्रज्ञानंदने दोन बरोबरी पत्करल्या आहेत. अनिश गिरी आणि क्वांग लिएम ले याच्याविरुद्ध त्याला बरोबरीवर समाधान मानावे लागले. एरिक हॅन्सेन, दिंग लिरेन, यान क्रिस्तोफ डुडा आणि शखिरयार मामेड्यारोव यांच्याविरुद्ध त्याला पराभव पत्करावा लागला. काही महिन्यापूर्वी कार्लसनविरुद्ध जगज्जेतेपदाची लढत गमवावा लागणारा रशियाचा इयान नेपोम्नीआच्ची १९ गुणांसह आघाडीवर असून, लिरेन १५ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.
आर. प्रज्ञानंद विषयी
सर्वात लहान वयात ग्रॅंड मास्टर किताब मिळविणारा पाचवा खेळाडू. यापूर्वी अभिमन्यू मिश्रा, सर्जी कार्जाकिन, गुकेश डी आणि जाव्होकिर सिंडारोव. वयाच्या ८व्या वर्षी २०१३ मध्ये जागतिक युवा स्पर्धेतील विजेता वयाच्या सातव्या वर्षी फिडे मास्टर किताब. विशेष म्हणजे २०१५ मध्ये दहा वर्षांखालील गटात विजेतेपद सर्वात लहान वयात आंतरराष्ट्रीयमास्टर होण्याचा मान २०१६मध्ये . त्यावेळी त्याचे वय १० वर्षे, १० महिने १९ दिवस ज्युलिस बेअर चॅलेंजर्स मालिकेतील ऑन लाईन जलदगती स्पर्धेत एप्रिल २०२१ मध्ये पोल्गर चॅलेंज स्पर्धेचे विजेतेपद टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत २०२२ मध्ये आंद्रओे एसिपेन्को, विदीत गुजराथी आणि निल्स ग्रॅंडेलुईस यांच्यावर मात . ५.५ गुणांसह १२वे स्थान