
दैनिक चालु वार्ता
भूम तालुका प्रतिनिधी
नवनाथ यादव
भूम :- भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा विधान परिषदेचे अभ्यासू आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा वाढदिवस तालुका पदाधिकाऱ्यांनी भूम तालुक्यातील साजरा केला.या निमित्ताने पेढे वाटून फटाके फोडले.तसेच भूम रुग्णालय व पाथरूड येथे वृद्धाश्रमात फळवाटप केले.अन्नधान्य वाटप केले .दि.21 फेब्रुवारी 2022 रोजी आ.सुजितसिंह ठाकूर यांचा वाढदिवस निमित्त भाजपा भूम तालुका पदाधिकाऱ्यांनी भूम गोलाई चौकात एकमेकांना पेढे भरवले.रुग्णांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही फळ वाटप केले .
याशिवाय नळी वडगाव येथील वृद्धाश्रमात वृद्धांना फळे आणि अन्य धान्य वाटप केले .यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस आदम शेख तालुका अध्यक्ष महादेव वाडेकर .शहराध्यक्ष शंकर खामकर माजी उपनगराध्यक्ष श्रीराम मुळे,जनसेवा नागरी सहकारी बँकेचे संचालक बाबुराव खरात,किरण कुलकर्णी,मीडिया विभाग शहर अध्यक्ष सुजित वेदपाठक,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष महेबूब शेख . सचिन बारगजे,उद्योग आघाडीचे तालुका अध्यक्ष बापू बगाडे,माजी भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत मासाळ,बाबा वीर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.