दैनिक चालु वार्ता
अक्कलकुवा प्रतिनिधी
इंद्रसिंग वसावे
अक्कलकुवा :- तळोदा तालुक्यातील एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्पाचे कनिष्ठ लिपीक 5 हजार रूपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून लाचखोर लिपीक किशोर भरतसिंग पावरा यास रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार तळोदा येथील महाविद्यालय येथे पदवीचे शिक्षण घेत असून ते आदिवासी समाजाचे असून त्यांना शासनाने विनामुल्य शासकीय होस्टेल तळोदा येथे राहण्याची व्यवस्था केली आहे. त्यासाठी तक्रारदार व त्यांचे मित्रांनी तळोदा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात होस्टेलला प्रवेश मिळविण्याकरीता ऑक्टोंबर 2021 ला ऑनलाईन फॉर्म भरले होते.
त्यानंतर जानेवारी 2022 मध्ये होस्टेलमध्ये प्रवेश संबंधिची लिस्ट लागली होती. त्यात तक्रारदार व त्यांच्या मित्राचे नाव नव्हते. त्यानंतर दि.17 फेबु्रवारी रोजी सायंकाळी तक्रारदार यांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या कार्यालयातील लिपीक पावरा यांचा फोन तक्रारदार यांना आला व पैश्यांची मागणी केली असता आज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे लिपीक किशोर पावरा यांनी पंचसाक्षीदारांसमोर 7 हजार रूपये लाचेची मागणी केली.
मात्र तडजोडीअंती 5 हजार रूपयांची रक्कम तळोदा येथील जय अंबे नाश्ता कॉर्नर व भोजनालयाच्या बाजुस असलेल्या मीरा कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी पंचसाक्षीदारांसमोर लाच स्विकारतांना रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी ॲन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस उपअधिक्षक राकेश चौधरी, पोलीस निरीक्षक श्रीमती माधवी वाघ, पोलीस निरीक्षक समाधान वाघ, उत्तम महाजन, विलास पाटील, विजय ठाकरे, संजय गुमाने, अमोल मराठे, चित्ते, देवराम गावीत, ज्योती पाटील, महाले आदींच्या पथकाने केली आहे.