
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
दर्यापूर आणि अंजनगाव येथे दोन दिवसीय स्वाधार व स्वयं योजनेच्या कॅम्पचे आयोजन
अमरावती :- अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन वसतीगृहाची सोय करते;मात्र ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही अशाने काय करायचे?त्यासाठी अशा विद्यार्थ्यांना शासनाने नवीन योजना अंमलात आणली आहे.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना असे या योजनेचे नाव असून या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे.तसेच भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करून दिली जाणार आहे.
अमरावती शहरात शिकत असलेल्या परंतु वसतिगृहात नंबर न लागलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्याना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.या योजनेचे कॅम्प समाजकल्याण विभागामार्फत आमदार बळवंत वानखडे यांच्या विनंतीनुसार दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ रोजी दर्यापूर येथील मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह येथे आयोजीत केला आहार तसेच दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ रोजी अंजनगाव सुर्जी येथे मागासवर्गीय मुलांचे निवासी वसतिगृह पांढरी येथे आयोजीत केला आहे.सदर योजनेची २८ फेब्रुवारी शेवटची तारीख असून अमरावती शहरात शिकणाऱ्या दर्यापूर व अंजनगाव सुर्जी येथील विद्यार्थ्यानी योजनेचा फॉर्म भरून लाभ घेण्याचे आवाहन दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंतभाऊ वानखडे यांनी केले आहे.