
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
पुतळ्यांवरून राजकीय भांडवल न करता महाराजांचे विचार आचरणात घ्या – सचिन वाटकर
अमरावती :- महाजनपुरी गेट येथे ,वीरशैव कंकय्या चर्मकार विकास संस्था यांचे वतीने महाराष्ट्राचा जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती महाजनपुरी गेट येथे मोठे उत्सवात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आमचे वरिष्ठ मार्गदर्शक महाराष्ट्र पोलीस दल श्री.दिनेशजी सावरकर लाभले.प्रमुख उपस्थिती संस्थेचे जिल्हा संघटक सचिन वाटकर, शेतकरी जिल्हा संघटक, आनंद आमले हजर होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.दिनेशजी सावरकर यांनी त्यांचे अभ्यासपूर्ण भाषणात शिवचरित्रावर सखोल असे मार्गदर्शन केले,तसेच इतर मान्यवरांनी सुद्धा विशेष असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला विशेष उपस्थितीमध्ये नाना भाऊ सावरकर, श्री मधुकर रावजी विजयकर ,अरुण भाऊ चव्हाण, गणेश मेशकर, अरुण विजयकर ,उमेश गायकवाड ,नरेंद्र चव्हाण ,कैलास पिढेकर ,अजिंक्य सावरकर ,पिंटू विजयकर, कृष्णा पिढेकर, विजय डी सावरकर ,मोंटू वाटकर, चेतन नांदुरकर ,अरविंद सावरकर ,शुभम कराळे, दादू चव्हाण, दिनेश वाटकर, रवींद्र उज्जैनकर, बाल्या रावेकर, रवी सावरकर, धीरज अरजापुरे ,रोहित सावरकर ,नरेंद्र रावळे,मनीष सावरकर,मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.