
दैनिक चालु वार्ता
कोरपना तालूका ग्रामीण प्रतिनिधी
प्रदिप मडावी
चंद्रपूर :-छत्तीसगढ राज्यातील कोरबा जिल्हात असलेल्या ग्राम गुरसिया तहसील पोंडी उपरोडा येथे गोंडवाना गणतंत्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष स्व. दादा हिरासिंह मरकाम यांचा पुतळा स्थापित करण्यात आला होता. काही असामाजिक समाज कंटक लोकांनी दादा हिरासिंह मरकाम यांच्या पुतळ्याची दि.17/02/2022 च्या रात्रीला तोडफोड केली सदर तोडफोडीची दुःखद घटना सकाळी लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर लोकांच्या भावना दुखावल्या व परिसरातील समाज मोठ्या प्रमाणात गोळा झाला.
दादा हिरासिंह मरकाम यांनी गोंडवाना संग्रम विकास क्रांती आंदोलनाच्या माध्यमातून समाजाच्या वंचित, उपेक्षित व अन्यायग्रस्त लोकांना जागृत केले, गोंडवाना गणतंत्र पार्टीची स्थापना करून सामाजिक कार्यासोबत राजकीय मंच तयार करून जनतेच्या हक्क व अधिकारासाठी आंदोलने करून संविधानिक व कायदेशीर अधिकार मिळवून दिले. त्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्या विषयी आदराची भावना निर्माण झाली, दादा हिरासिंह मरकाम यांचे देहवासन झाल्यानंतर त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे यासाठी जनतेनी अनेक गावात त्यांच्या पुतळ्याची स्थापना केली, तीच भावना ठेवून ग्राम गुरसिया येथील जनतेने त्यांच्या पुतळ्याची स्थापना केली.
परंतु विघटनकारी काही असामाजिक विचारांच्या समाज कंटकांनी त्यांच्या पुतळ्याची दि.17/02/2022 ला तोडफोड करून समाज भावना दुखावल्या अश्या अघटित घटना घडवून हे समाजकंटक समाजात द्वेषाचे विष पसरवून समाजा-समाजात, लोका -लोकांत भांडणे लावण्याचा प्रयत्न करतात. देशात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करतात त्यामुळे असा कंटाकांना वेळीच अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे. दि.17/02/2022 ला गोंडवाना रत्न दादा हिरासिंह मरकाम यांच्या पुतळ्याची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारावर समाज कंटाकांना अटक करून कारवाई करण्यात यावे या मागणीचे निवेदन गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहीम राष्ट्रपती व केंद्रीय गृहमंत्र्यांना देण्यात आले.
यावेळी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बापूरावजी मडावी, युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके, प्रदेश संघटन मंत्री नामदेव शेडमाके, चंद्रपूर जिल्हा संघटक संघटक संतोष कुळमेथे, जिवती तालुका महासचिव केशव कोहचाळे, गोंडवाना गणतंत्र पार्टी कोरपना तालुका प्रसिद्धी प्रमुख संकेत कुळमेथे उपस्थित होते.