
दैनिक चालु वार्ता
पालघर जिल्हा प्रतिनिधी
मिलिंद खरात
वाडा तालुका :- शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,राज्य सरकारी, निम सरकारी कर्मचारी, शिक्षक संघटना समन्वय समितीने २३ व २४ फेब्रुवारी २०२२ च्या राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. शिक्षक भारती या समन्वय समितीचा घटक आहे. आमदार कपिल पाटील यांच्या सूचनेनुसार शिक्षक भारतीने या संपाला पाठिंबा जाहीर केला आहे. सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करावे, असे आवाहन शिक्षक भारतीच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्य सरकारी, निम सरकारी कर्मचारी, शिक्षक संघटना समन्वय समितीने २३ व २४ फेब्रुवारी २०२२ च्या राज्यव्यापी संपाची हाक दिलेली आहे.
यासंदर्भात शिक्षक, कर्मचारी यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत
1) सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा.
2) 100 टक्के अनुदान द्या.
3) शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची रिक्त पदे त्वरीत भरा.
4) सातव्या वेतन आयोगानुसार आश्वासित प्रगती योजना लागू करा.
5) बक्षी समितीचा खंड 2 तातडीने प्रसिद्ध करा.
6) अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन त्यांच्या जिल्ह्यातच करा.
7) विषयांना शिक्षक नाकारणारा 28 ऑगस्ट 2015, कला क्रीडा शिक्षकांना हद्दपार करणारा 7 ऑक्टोबर 2015 आणि रात्रशाळा संकटात टाकणारा 17 मे 2017 चा शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय मागे घ्या.
8) वस्तीशाळा शिक्षक आणि अप्रशिक्षित शिक्षण सेवक यांना मूळ सेवेपासून वरिष्ठ वेतनश्रेणी द्या.
9) 20 पटाच्या आतील शाळा बंद करु नका.
10) सहाय्यक शिक्षक परिविक्षाधिन यांना वेतन श्रेणी लागू करा आणि परिविक्षाधिन कालावधी कमी करा.
11) अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तासिका तत्त्वावर काम करणारे सर्वच शिक्षकांना सातवा वेतन आयोग तातडीने लागू करा.
12) संस्थांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनेतर अनुदान सुरु करा.
13) वरिष्ठ व निवडश्रेणी विनाअट लागू करा.
14) आयटी विषय शिक्षकांना वेतन मंजूर करा.
15) सावित्रीबाई फुले – फातिमा शेख शिक्षक कुटुंब कॅशलेस आरोग्य योजना लागू करा.
16) शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नका.
17) केंद्राप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्ष बालसंगोपन रजा द्या.
18) खाजगीकरण आणि कंत्राटीकरण रद्द करा.
अश्या प्रकारच्या मागण्या आहेत अशी माहिती पालघर जिल्हा अध्यक्ष श्री .शेलार सर यांनी दिली .