
दैनिक चालु वार्ता
गंगापूर प्रतिनिधी
सुनिल झिंजुर्डे पाटिल
गंगापूर :- गंगापूर तालुक्यात संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून सामाजिक चळवळीतुन शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणारे, बहुजन समाजाच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आंदोलन करुन प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासु व आक्रमक भूमिका घेणारे कार्यकर्ते म्हणुन प्रसिद्ध असलेले संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष संकेत मैराळ व किशोर परभने यांनी आपल्या शेकडो कार्यकत्यांसह सिंचन भवन औरंगाबाद येथे राज्याचे आरोग्यमंत्री मा,ना,राजेश टोपे साहेब, जिल्हा अध्यक्ष कैलास पाटील, युवा नेते संतोष माने,तालुका अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर नीळ, विश्वजित चव्हाण विधानसभा अध्यक्ष महेश उबाळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी संकेत मैराळ यांच्या सह बहुजन समाजात काम करणारे दिपक खैरे,निलेश काळे,नितीन परभने,संतोष परभने,उमेश आवारे,विक्रम मैराळ यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यानी देखील प्रवेश केला आहे,या प्रवेशानंतर संकेत मैराळ पाटील व किशोर परभने यांच्यासह सर्वाना संतोष माने, डॉ ज्ञानेश्वर निळ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.