
दैनिक चालु वार्ता
अक्कलकुवा प्रतिनिधी
आपसिंग पाडवी
अक्कलकुवा :- चि.तन्मय सचिन राजपूत रा.हेंद्रुण ता.जि.धुळे याला नोव्हेंबर २०२१ मध्ये झालेल्या इंग्रजी आँलिंम्पीयाड मध्ये सिल्वर पदक मिळाले आहे.नुकताच हा रिझल्ट जाहिर झाला आहे. तन्मय ने झोन मध्ये १९,नँशनल लेवल ला ७३ तर इंटरनॅशनल लेवल ला ९३ अशी रँकिंग मिळवली आहे.त्याला ८८.५७ टक्के मिळाले असुन १.५० टक्यांनी त्याचे गोल्ड मेडल हुकले आहे.तो धुळे येथील चावरा पब्लीक स्कुलचा विद्यार्थी असुन ईयत्ता ५वी सिबीएसई मध्ये तो शिकत आहे.
त्याला स्कुलचे मँनेजर फादर सिजन थाँमस,मुख्याध्यापिका संगिता पवार ,वर्ग शिक्षिका अर्चना पाटील व इंग्रजी शिक्षिका जयश्री पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.तन्मय ला गेल्या वर्षी ४ थी मध्ये गणित इंटरनँशनल आँलिंम्पीयाड मध्ये सुध्दा सिल्वर पदक मिळाले होते.तन्मय चे वडिल अक्कलकुवा जि.नंदुरबार येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागात कार्यरत असुन त्याची आई अर्चना राजपूत(पाटील) ह्या प्राथमिक शिक्षिका म्हणुन आर्वी ता.धुळे येथे कार्यरत आहेत.तन्मय चे स्कुल व नातेवाईक यांनी अभिनंदन केले असुन त्याला पुढील यशासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत…