
दैनिक चालु वार्ता
आपसिंग पाडवी अक्कलकुवा प्रतिनिधी
धडगाव :- तालुक्यातील देवबारा येथे मंगळवार पासुन दोन दिवसीय वाग्देव यात्रोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे.. या यात्रोत्सवात गुजरात , मध्य प्रदेश महाराष्ट्रातील आदिवासी सहभागी होतात .कोरोनाचा पर्रादुर्भाव बघता कोविड 19 च्या सुचनांचे पालन करून भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. येथील आदिवासी बांधव निसगांचा एक भाग असलेल्या वनांमध्ये निवास करणाऱ्या वाघाने गावशिवारातील पशु पक्षी , माणसे यांच्यावर हल्ला करू नये , गाव पाड्यात समृद्धी नांदावी यासाठी माघ महिन्यात महाशिवरात्रीपूर्वी वाग्देवता पूजन केले जाते . येथे पूजन झाल्यानंतर आदिवासी बांधव याहामोगी देवीच्या दर्शनासाठी देवमोगरा ( गुजरात ) येथे रवाना होतात .
वाग्देवाला आदिवासी महिलांकडून बांबूच्या टोपलीत आणलेले धनधान्य आणि महू यांचा नैवेद्य दाखवला जातो . हा नैवेद्य दाखवल्यानंतर पूजन करून ठिकठिकाणी यात्रोत्सवांना प्रारंभ करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरु आहे . आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील देवबारा येथील मंदिराच्या परिसरात विविध सुविधांची वानवा असल्याने या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी आहे . शिवाय या भागात मंदिराचे सुशोभिकरण भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची करून , बैठक व्यवस्था , व्यवस्था , आहे . चांगल्या दर्जाचे सामाजिक सभागृह आदी उभारण्याची गरज आहे.
सुविधांअभावी अनेकवेळा येथे लांबून येणाऱ्या भाविकांचे हाल होतआहे . तीन वर्षांपूर्वी या ठिकाणी चांगल्या दर्जाचे मंदिर उभारण्यात आले आहे . या मंदिराला अनेक सुविधांची गरज असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे . येथील या्रोत्सवानंतर इतर ठिकाणच्या यात्रोत्सवांना सुरुवात होते.घडगाव शहादा रस्त्यावर १२ घडगावपासून किलोमीटर अंतरावर देवबारागाव आहे . वाग्देवाचे स्थान म्हणून आदिवासी बांधवांमध्ये त्याची ओळख आहे . या ठिकाणी महाशिवरात्रीपूर्वी यात्रोत्सवाची परंपरा आहे.
यावर्षी हा या्तोत्सव मंगळवार व बुधवार असा दोन divas असणार आहे. देवबारा येथील यात्रोत्सवानंतर कानाकोपऱ्यातील सातपुड्याच्या यात्रोत्सवांना सुरुवात होते . गावोगावी वाग्देव पूजनाचे कार्यक्रमही घेण्यात येतात . महाशिवरात्रीपासून दुर्गम भागातील तोरणमाळ आणि देवमोगरा येथे यात्रोत्सव असल्याने आदिवासी बांधवांमध्ये चैतन्य संचारल्याचे सध्या दिसून येत आहे .