
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
औरंगाबाद :- येथील जेष्ठ साहित्यीक धोंडिरामसिंह राजपूत लिखित
धार्मिक कविता संग्रह”पालखी”या काव्यसंग्रहांचे प्रकाशन केंद्रीय अर्थराज्यमंत्री ना, डॉ,भागवत कराड यांच्या हस्ते वैजापूर तालुक्यातील सटाणा येथे नुकतेच करण्यात आले, डॉ,कराड यांनी या काव्य संग्रहाबाबत धोंडीरामसिंह राजपूत यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
या संग्रहातील धार्मिक कविता समाजातील भक्त -भाविकांच्या मनाला भावणाऱ्या आहेत,त्या समाजातील नागरिकांना निश्चित आवडतील असे वक्तव्य केले या प्रसंगी भाजपा चे जिल्हा अध्यक्ष विजय औताडे, जिल्हा सरचिटणीस डॉ,दिनेश परदेशी,एकनाथ जाधव,कैलास पवार, डॉ,राजीव डोंगरे यांची उपस्थिती होती,सूत्र संचलन कल्याण दांगोडे यांनी केले.
श्री राजपूत यांची ३५पुस्तके कविता संग्रह,व कथा कृषी वर व सामाजिक क्षेत्रावर ललित लेख संग्रह प्रकाशित झालेले आहे,(फोटो कॅप्शन “पालखी”या धार्मिक काव्य संग्रहाचे प्रकाशन करतांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना,डॉ,भागवत कराड, डॉ,दिनेश परदेशी,विजय औताडे,एकनाथ जाधव,कवी धोंडीराम सिंह राजपूत,डॉ,राजीव डोंगरे,कैलास पवार व ईतर)