दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- देगलूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या देगलूर येथील दुय्यम निरीक्षक कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे गावागावात दारूचा महापूर वाहत आहे देगलूरच्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण का नसावे ?हा प्रश्न आता उपस्थित होताना दिसून येत आहे गावागावात देशी-विदेशी हातभट्टीची दारू तसेच सिंधी व बनावट दारू ही विकल्या जात आहेत. दारूबंदी विभागास स्थानिक पोलिस प्रशासनाने देखील दखल घेताना दिसून येत नाही.
देगलूर तालुक्यातील सर्वाधिक अवैध दारू विक्री चे माहेरघर अशी सध्या ओळख ठाणे गावची बनत चालली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक कार्यालयाचे कर्मचारी अवैध दारू विक्री करणार्यावर कारवाईचा बडगा ारत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकारी मेहरबान का असतील?हा संशोधनाचा विषय आहे हाणेगाव परिसरातील जवळपास 30 ते 40 खेड्यात सहजरीत्या अवैध देशी गावठी विदेशी उपलब्ध होत असताना दारूबंदी विभाग व उमरखेड पोलिस झोपेचे सोंग घेत आहे.