
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांकडून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे उमेदवार असू शकतात, अशी चर्चा असताना एक मोठी बातमी समोर येत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर नितीश कुमार भाजप आघाडीपासून म्हणजेच एनडीएपासून वेगळे होण्याचा विचार करत आहेत. याबाबत ते लवकरच निर्णय घेऊ शकतात. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी अलीकडेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) आणि नितीश कुमार यांची भेट घेतली आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे लक्ष ठेवून आहेत.