
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- या गाण्यावर भन्नाट रिल्स आणि व्हिडीओदेखील बनत आहेत. हे गाणे भुवन बडायकरने गायले आहे. भुवन हा एक शेंगदाणे विक्रेता आहे. पण ‘कच्चा बदाम’ या गाण्यामुळे तो रातोरात सेलिब्रिटी झाला आहे. त्याला अनेक ऑफर्स मिळू लागल्या आहेत. भुवन बडायकर शेंगदाणे विकताना ‘बदाम… बदाम… कच्चा बदाम’ असे म्हणायचा. भुवन बडायकर असे या शेंगदाणा विक्रेत्याचे नाव आहे. भुवन बडायकर हे पश्चिम बंगालमधील कुरलजुरी या गावचे रहिवासी आहेत.
पश्चिम बंगालमध्ये बदामाला ‘कच्चा बदाम’ म्हणतात. भुवन शेंगदाणे विकताना ‘बदाम… बदाम… कच्चा बदाम’ असं त्याच्या शैलीमध्ये गायचा. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी यावर रिल्स आणि व्हिडीओही बनवले. त्यानंतर या गाण्याचं आता रॅप वर्जनमध्ये गाणं आलं आहे. तेही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे. सोशल मीडियावर सध्या ‘कच्चा बदाम’ गाण्याने धुमाकूळ घातला आहे. सर्वसामान्यांपासून बड्या सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण ‘कच्चा बदाम’वर थिरकताना दिसत आहेत.
भुवन एकेकाळी शेंगदाणे विकत गावोगावी फिरत असे. पण ‘कच्चा बदाम’ या गाण्याने भुवनला लोकप्रियता मिळाली. तसेच त्याला अनेक ऑफर्सदेखील मिळत आहेत. 50 वर्षांच्या भुवनची सध्या सर्वत्र चर्चा आहे. इन्स्टाग्रामवर अनेकांनी ‘कच्चा बदाम’ गाण्यावर रील्स बनवल्या आहेत. यात अनेक सेलिब्रिटींचादेखील समावेश आहे.