
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. चेन्नईच्या प्राईम पॉईंट फाउंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो. यावेळी देशातल्या 11 खासदारांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या चार खासदारांचा यात समावेश आहे. शिवसेनेचे श्रीरंग बारणे राष्ट्रवादीच्या फौजिया खान , भाजपच्या हीना गावित यांना देखील संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे.
कामगिरीतल्या सातत्याबद्दल सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणे यांना “संसद विशिष्ट रत्न’ पुरस्कार असणार आहे. चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा संसदरत्न 2022 हा पुरस्कार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजप खासदार हिना गावित आणि राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांना देण्यात येत असल्याची माहिती फाउंडेशनच्या वतीने जाहिर करण्यात आली आहे.