
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ५ संतोषी नगर येथील नगरसेवक संजय वानरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या संतोषी नगर उद्यानाचे लोकार्पण मा.आ. प्रविणभाऊ पोटे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी महापौर चेतनजी गावंडे, भाजपा शहर अध्यक्ष किरणजी पातूरकर, उपमहापौर सौ.कुसुमताई साहू, नगरसेविका सौ.निता प्रमोद राऊत, नगरसेविका सौ.माधुरी सुहास ठाकरे, नगरसेवक प्रणित सोनी, रविभाऊ खांडेकर, जयंतभाऊ डेहनकर, कौशिक अग्रवाल, नगरातील जेष्ठ नागरिक रत्नाकर, वासनकर, माणिकराव राऊत, राजेश पाचघरे, कुणाल कोटेकर, पंकज सोनटक्के, संजय पावडे, सौरभ सोनटक्के, राजू सोनटक्के, सतीश करेसिया, लखन राज, भुजाडे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमात मनपा उद्यान कर्मचारी श्री.गिरी, जितू नाईक यांचे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.या कार्यक्रमाचे संचालन हरीश साउरकर यांनी केले.