
दैनिक चालु वार्ता
मुक्ताईनगर प्रतिनिधी
सुमित शर्मा
मुक्ताईनगर (जळगाव ) :- कुऱ्हा काकोडा येथील संभाजीनगर येथे गजानन महाराजांच्या 144 व्या प्रकट दिनानिमित्त परिसरातील महिलां भगिनी सकाळी ४ वाजेपासून गजानन महाराजांच्या मंदिरात विजय ग्रंथाचे पारायण करण्यात आले तसेच गणगण गणात होते भजनात दंग होऊन दिंडी सोहळा काढण्यात आला लहान मोठ्यांनी सहभाग घेऊन दिवसभर भक्तिमय वातावरणात गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या सोहळा संपन्न केला तर संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी परिसरातील महिला पुरुष लहानांनी वेशभूषा करून मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन महाराजांचा प्रकट दिनाचा सोहळा उत्साहात साजरा केला